भव्य ओबीसी परिषद संदर्भात गडचांदूर नगरीत सहविचार सभा संपन्न

0
402

भव्य ओबीसी परिषद संदर्भात गडचांदूर नगरीत सहविचार सभा संपन्न

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
गडचांदूर नगरीतील PWD कार्यालयात दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोज गुरुवारला एक दिवसीय भव्य ओबीसी परिषद घेणे बाबत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

ओबीसी ची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी आरक्षणाचे काय फायदे, समाजामध्ये ओबीसी जनजागृती व्हावी, आरक्षणाचे महत्त्व कळावे, सोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.

या सभेला हरिदासजी गौरकार, प्रभाकरजी गेडाम, सुधाकरजी तुराणकर, गणेश तुराणकर, देवराव ठावरी, विलास कोंगरे, उमेश लांजेकर, नितेश भिवापुरे, सतिश बिडकर, कपनाथ ताजने, प्रमोदजी तुराणकार, प्रकाश तुराणकर, प्रविण लाटेलवार, संतोष निखाडे, शेख मुनिर, प्रविण मेश्राम, सतिश भोजेकर, अरविंद वाघमारे, अतुल टोंगे, सुनिल अरकीलवार, प्रविण काकडे आदी समाजबांधव उपस्थित होता. सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here