सत्कारामुळे कार्य करण्यात मिळते प्रोत्साहन – हरीश शर्मा

0
440

सत्कारामुळे कार्य करण्यात मिळते प्रोत्साहन – हरीश शर्मा

 

कोठारी, राज जुनघरे
सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केल्याने त्याचे कार्यास बळ मिळते. नवीन ऊर्जा मिळत असते, असे प्रतिपादन बलारपूर नगरपरिषद चे माजी अध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले.

राजुरा जेसीआय रॉयल झोन च्या वतीने बल्लारपूर येथे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या काही पत्रकाराचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य तिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, जेसीआय चे उपक्षेत्रीय अध्यक्ष प्रतीक सारडा,जेसीआय राजुरा अध्यक्ष सुशीला पुरेड्डीवार,माजी अध्यक्ष सुषमा शुक्ला, जेसी स्मृती व्यवहारे उपस्थित होते.

या कार्यक्रमात पत्रकार संतोष कुंदोजवार, राममिलन सोनकर,सुरेश साळवे, बादल बेले,श्रीकृष्ण गोरे, किरण घाटे या पत्रकाराचा मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन जेसी मंजू गौतम यांनी केले. तर जेसी मधूस्मिता पाढि यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जेसी स्वरूपा झंवर, राधा विरमलवार, डाँक्टर मनीषा पाटणकर, रितू पांढारे, मनीषा पुन, प्रफ्फुला धोपटे, लक्ष्मी प्रसाद,शांता ठाकूर, नैना तान्द्रा, नितु खेडेकर, स्वतंत्रकुमार शुक्ला, प्रवीण खेडेकर, रामसुमेर निषाद, संमेया एलकापल्ली आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here