सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टॅण्ड पर्यंतचे खड्डे बुजवून डांबरीकरण करा

0
406

सास्ती टी पॉईंट ते रामपूर बस स्टॅण्ड पर्यंतचे खड्डे बुजवून डांबरीकरण करा

रा. काँ. युवक शहराध्यक्ष स्वप्नीलभाऊ बाजूजवार यांची मागणी; मॉर्निंग वॉक नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजुरा : राजुरा-गोवरी-कवठाळा मुख्य मार्गावरील सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टॅन्ड पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे, पाचशे मीटर अंतरामध्ये सतत अपघाताची मालिका घडत आहे.
त्यामुळे या मार्गावरील पडलेले खड्डे बुजवून तेवढ्या जागेत डांबरीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे राजुरा शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा यांच्याकडे केली आहे.

मागील एक वर्षांपासून सास्ती टी पॉईंट ते गोवरी-पोवनी रस्त्याचे काम सुरु आहे मात्र हे काम कासव गतीने सुरु असून वस्तीलगत असलेल्या रस्त्यावर नालीकरिता खोदकाम केलेली माती मुख्य मार्गावर आल्याने संपूर्ण धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. जे काम केले ते कामसुद्धा अर्धवट आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्याबरोबर धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. या मार्गालागत असलेल्या शेतकऱ्यांची पिके काळवंडत असून पिकाचे नुकसान होत आहे.

या बांधकामाविषयी रामपूर येथील नागरिकांनी उपविभागीय अभियंता यांना विचारणा केली असता रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, लवकरच काम होत आहे ही उत्तरे नित्याचीच असून तब्बल एक वर्ष झाले परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. रामपूर येथील नागरिकांच्या घरात धुळीचे थर साचत आहे, पाऊस आला की चिखल नाही तर धूळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम पडत आहे. रामपूर येथील नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी याच धुळीच्या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांचा अंत न पाहता तात्काळ काम सुरु करून सास्ती टी पॉईंट ते रामपूर बसस्टँड पर्यंत रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडले खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी केली असून येत्या १८ ऑक्टोबर पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु न केल्यास रामपूर येथील रस्त्यावर जनआंदोलन उभारून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रखीब शेख, युवक तालुकाध्यक्ष असिफ सय्यद, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बजूजवार, शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, जहीर खान, संदीप पोगला, आशिष गेडाम, गौरव कोडापे, गोपाल मडावी, ऑस्टिन सावरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here