गडचांदूरातील बंगाली कॅम्पवासी 40 वर्षांपासून जगत आहे निर्वासितांचे जीवन!

0
587

गडचांदूरातील बंगाली कॅम्पवासी 40 वर्षांपासून जगत आहे निर्वासितांचे जीवन!

मुलभुत सुविधा देण्यास शासनप्रशासन अपयशी

 

कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्पवासी गेल्या अंदाजे 40 वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगत असून वीज,रस्ते,नाली,घरकुल अंगणवाडी अशा जीवनावश्यक व मुलभूत सुविधांपासून हे कुटुंब वंचित आहे.हक्काचे जीवन जगता यावे यासाठी यांनी अनेकदा संबंधितांचे उंबरठे झिजवले मात्र दरवेळी निराशाच पदरी पडली.मुलभुत सुविधा पुरविण्यात शासनप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे आरोप होत असून शहरातील इतर प्रभागातील नागरिकांना मिळत असलेली सुविधा आम्हालाही मिळावी अशी भावना सदर कॅम्पवासी व्यक्त करत आहे.बंगाली कॅम्पची जागा माणिकगड सिमेंट कंपनीची असल्याचा वाद सध्या न्यालयात सुरू आहे हे मात्र विशेष.
अनेक निवडणूका आल्या आणि गेल्या, पुढाऱ्यांनी अनेक आश्वासने देऊन मते मागितली मात्र निवडणूक संपली की कोणीही यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही.यामुळे आजतागायत परिस्थितीत बदल घडलाच नाही.वीज पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना लहानलहान मुलांसह किट्ट अंधारातच दिवस काढावे लागत आहे.विषारी प्राण्यांचा धोका वाढला असून सर्पदंशाने काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागल्याचे कळते.इतकी वर्षे लोटुनही येथील कुटूंब अक्षरश: रानटी जीवन जगत असतानाच कोणत्याही लोकप्रतिनिधींनी यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिली नाही.ही शोकांतिका असून विकासाचे ढिंडोरे पिटणाऱ्यांना बंगाली कॅम्पवासी एक चपराकच,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.शासनप्रशान यांना केव्हा न्याय देतात याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here