फ्रायडे फॉर फ्युचरच्या विद्यार्थिनींनी केले रामाळा  तलाव बचावासाठी प्रदर्शन 

0
433

फ्रायडे फॉर फ्युचरच्या विद्यार्थिनींनी केले रामाळा  तलाव बचावासाठी प्रदर्शन 

माजी खासदार नरेश पुगलिया यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

चंद्रपूर – शहरातील गोंडकालीन रामाळा तलावातील वाढते जलप्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी चंद्रपूर शहरातील फ्रायडे फॉरफ्युचरच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी रामाळा तलावाच्याकाठावर फलक घेऊन प्रदर्शन केले. इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहालात्यांनी पाठिंबा दिला. 

चंद्रपूर शहरातील प्रदूषित वातावरणाने जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी दर शुक्रवारी शालेय विद्यार्थींनीनी फ्रायडे फॉर फ्युचर उपक्रमाअंतर्गत आंदोलन केले होते. आता जल प्रदूषण कमी करण्यासाठी  इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सुरु केलेल्या अन्नत्यागसत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी या मुलींनी मानवी साखळी केली. आज आंदोलनाचा १२ वा दिवस असून, प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून इको प्रो ने केलेल्या मागण्या तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. चंद्रपूरशिवाय महाराष्ट्रातील सर्व जलस्रोत प्रदूषण मुक्त करण्याची मागणीही केली आहे.  आज पंजाबी सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष विक्रम शर्मा, सचिव नितीन कपूर, कोषाध्यक्ष जतींद्र कुमार यांनी पाठींबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here