बॅंक ऑफ इंडिया कोठारी शाखेचा वर्धापन दिन

0
600

बॅंक ऑफ इंडिया कोठारी शाखेचा वर्धापन दिन

 

कोठारी,राज जुनघरे :- स्थानिक बॅंक ऑफ इंडिया शाखेची स्थापना ३० डिसेंबर १९७६ रोजी झाली. चालू आर्थिक वर्षात सदर शाखेला ४५ वर्षाचा काळ पुर्ण झाला याचे ॵचित्य साधुन कोठारी शाखेच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कोठारी क्षेत्रातील ग्रामीण भागात राष्ट्रीय बॅंकांच्या सेवा उपलब्ध नव्हत्या यामुळे या परिसरातील कळमना, पळसगांव, मानोरा, तोहोगाव, लाठी या चळीस की. मी. चौरस परिघातील नागरिकांना बॅकींग क्षेत्राचा लाभ मिळत नव्हता. सन १९७६ ला कोठारी येथे शाखेची स्थापना झाली आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळू लागला. आर्थिक व्यवहार प्रगल्भ झाले. आज बॅंक ऑफ इंडिया च्या कोठारी शाखेत हजारों खातेधारक आर्थिक व्यवहार करित आहेत. असे प्रतिपादन शाखा प्रबंधक आशिष अवचर यांनी केले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने बॅंकेच्या विविध योजना, उपक्रम व कर्ज वितरणासंबंधी उपस्थित खाते धारकांना माहीती दिली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी बाबुराव खोब्रागडे, व्यापारी प्रशांत टिंबडीया, पुश्पक बांगळे, कवडु गुरु, राजू वांढरे, राजू पहानपाटे, बंडू पहानपाटे, श्रिधर बुटले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॅंक अधिकारी स्नेहल मोरे, कर्मचारी अक्षय चिंतलवार, शुभम गाडीकर, चंद्रशेखर शिखरे, चंद्रकला पोरेते, बॅंक मित्र संदीप मोरे, अमोल वाढई यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here