आगामी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक पार्टी पूर्ण ताकदनिशी लढेल – आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे

0
541

आगामी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक पार्टी पूर्ण ताकदनिशी लढेल – आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे
🟩🌼🟣 चंद्रपूर🟡🟩 किरण घाटे🟣🟡 आगामी चंद्रपूर महानगर पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदनिशी आम आदमी पार्टी लढेल असा विश्वास आज शनिवार दि.९जानेवारीला येथील स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे यांनी व्यक्त केला .
🟣🟡🟢🛑आम आदमी पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 🛑🟣🟢🟩🌀महाराष्ट्रीयन जनता काँग्रेस भाजप या प्रस्थापित पक्षांच्या कारभाराला पूर्णता कंटाळली आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीने केलेल्या कामावर विश्वास ठेवून राज्यात पक्षाला बळ देत आहे. या बळाच्या आधारावरच पुढील एक वर्षात चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा ताकदनिशी लढवून महापालिका ताब्यात घेईल असा आशावाद देखिल रंगा राचुरेजी यांनी या वेळी व्यक्त केला.
🟢🛑🟨🟡🌀मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे कोषाध्यक्ष जगजित सिंहजी, विदर्भ अध्यक्ष प्रा. देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव, आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी, जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महानगर संघटनमंञी प्रशांत येरणे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जातीने उपस्थित होते.
🛑🟣🟡🟢 या आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले माहिती अधिकार कार्यकर्ते हुमायु अली , शेतकरी सुकाणू समितीचे प्रदीप बोबडे राजूरा बल्हारपूरच्या अल्का वेल्हे, कविता दोमाला, रूंदा मडावी, कविता मामीडवार, जानकी शुक्ला, जितेंद्र भाटीया, घोडपेठच्या विमल राजकुमार कवाडे यांनी पक्षप्रवेश केला.
मेळाव्याचे संचालन जिल्हा सचिव संतोष दोरखंडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here