माता महाकाली भक्तानां होणारी गैर सोय टाळावी – एड. सुनीता पाटील

0
342

माता महाकाली भक्तानां होणारी गैर सोय टाळावी – एड. सुनीता पाटील

चंद्रपुर ची आराध्य दैवत माता महाकाली येथे अनेक वर्षा पासून यात्रा भरत आली आहे. विविध ठिकाना वरुन भाविक भक्त दर्शना करिता येतात. नांदेड़, परभणी, कंधार, पूर्णा, माहुर, अकलूज आदि. मराठवाड़ा तील विविध जिल्हा व गाव स्तरावरुन भक्त येतात तसेच विदर्भातुन सुद्धा अनेक भक्त येतात . सर्व भक्त माता महाकाली च्या श्रध्ये पोटी झरपट नदी (नाला) येथे अंघोळ करतात . किती ही घाण असलेली ही नदी भक्तांना सूतक सोडवन्या साठी छान च वाटत कारण पर्याय नाही. होय, माता महाकाली देवस्थान संस्थान मार्फ़त येणाऱ्या भक्तांच्या अंदाजी सुद्धा अंघोळ ची व्यवस्था केले नाही आहे करिता भक्तानां अपू-या जानकारी मुळे मल मूत्र वाहणाऱ्या नदी नाल्यात अंघोळ करतात व दर्शना करिता जातात.
रैयतवारी , महाकाली कॉलरी कड़े असलेल्या स्मशानभूमि जवळील नाल्यात भक्तांची झुबंळ दिसत आहे , भक्तानां माहिती नाही व माहिती जरी असली तरी पर्याय नाही करिता अश्या घाण पाण्यात स्नान करतात, जवळच मल मूत्र करतात. हीच योग्य ती सोय माता महाकाली देवस्थान संस्थान ने देण्यात यावी व या कड़े जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिका ने लक्ष द्यावे ही विनंती आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे व भाविक भक्तानां कडून ही मागणी करण्यात येत आहे. चंद्रपुर मधील स्थानिक भक्तांची तक्रार वर आप महानगर चे महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटिल यांनी महाकाली कॉलरी रैयतवारी कड़े असलेली स्मशान भूमि कड़े नाल्यात आंघोळ करीत असलेल्या भक्तांच्या भावना जानून घेत या कड़े उद्या जिल्हा प्रशासन व महानगर पालिका यांना निवदेन मार्फ़त योग्य ती सोय करावी व स्वच्छते कड़े भर द्यावी ही मागणी करण्यात येणार आहे.
सदर स्थानी भेट देताना उपस्थित राणी जैन, जास्मिन शेख, रूपा काटकर, शबनम शेख, मीना पोटफोडे, सिकंदर सागोरे, राजेश चेडगुलवार आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here