अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी. व्हिडिओकॉन कंपनी समोरील घटना.

238

 

ग्यानीवंत गेडाम/वरोरा

 

वरोरा तालुक्यातील मजरा जवळ असलेल्या व्हिडिओकॉन कंपनी गेट समोर आज सायंकाळच्या सहा वाजताच्या सुमारास मोटर सायकल ला मागून टिप्परने धडक दिल्याने एक इसम ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्तानुसार बांद्रा (बोरगाव) निवासी गहू दास वारलु मगरे वय अंदाजे 55 वर्ष, राजेंद्र बाजीराव मगरे वय अंदाजे 50वर्ष हे आपल्या मोटरसायकल एम एच 34 आर 1885 ने गावाकडून वरोरा येथे जात असताना मागून येणाऱ्या टिप्परने एम एच 40 एन 3745 अचानक मागून जोरदार मोटर सायकल ला धडक दिल्याने गहू दास मगरे हा जागीच ठार तर राजेंद्र मगरे हा गंभीरित्या जखमी झाला आहे. जखमीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला रेफर करण्यात आले आहे. मृतक आणि जखमी हे आपल्या शिक्षण घेत असलेल्या मुलीला वरोरा येथे काही सामान नेऊन देत असताना हा अपघात घडला आहे.

मृतक गहुदास हा बांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ता व प्रसिद्ध कबड्डीपटू भास्कर मगरे यांचे वडील असून त्यांच्यावर व त्यांचे परिवार यांचे वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार टिप्पर चालक हा दारू पिऊन टिप्पर चालवत असल्याचे सांगितले.

advt