लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून शाळेला शैक्षणिक, जीवनावश्यक वस्तु भेट…

338

लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून शाळेला शैक्षणिक, जीवनावश्यक वस्तु भेट…

दि.१४ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस कंपनीकडून बालदिनानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय येथे संगणक देण्यात आले.व लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून सीएसआर निधीतून भेट देऊन विद्यार्थीचा चेहर्‍यावर हास्य फुलले. संगणक प्रशिक्षण ही आज काळाची गरज असून बरेच भागातील सर्वच विद्यार्थी हे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रियदर्शिनी शाळेत देण्यात आले.

जनता विद्यालय शाळा घुग्घुस येथे वाॅटर कुलर देण्यात आले. पाणी हे जीवनावश्यक वस्तु आहे,आपल्या पांघरुणाची घडी करणं, अडीनडीला वाणसामान आणून देणं, घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देणं, वेळ पडल्यावर चहा करणं.. ही सगळी कामं कितीही किरकोळ वाटली, तरी ही सर्व ‘जीवनकौशल्यं’ आहेत. आपल्याला जी गोष्ट योग्य वाटत नाही, त्याला ठामपणे ‘नाही’ म्हणणं हेही जीवनकौशल्यच आहे. मुलांनी फक्त अभ्यास व्यवस्थित करून भागणार नाही. कोणत्याही क्षणी गरज भासू शकेल अशी, प्रत्येक वेळी पैशानं विकत न घेता येणारी जीवनकौशल्यं त्यांना शिकवावीच लागतील. असे उद्योगाचे प्रमुख हेड मा.श्री.संजय कुमार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यांचे आभार मुख्य प्रशिक्षकांनी केले.

यावेळी उद्योगाचे प्रमुख हेड मा.श्री.संजयकुमार सिंग,एच.आर विभागाचे उपाध्यक्ष श्री.प्रशांत पुरी,एच.आर उपाध्यक्ष पवन मेश्राम, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक तरुण केशवानी,रतन मेढा,प्रियदर्शिनी शाळेचे मुख्याध्यापिका अन्नू खानझोडे,जनता शाळेचे मुख्याध्यापक विठोबा पोले, शाळेतील शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी इतर सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

advt