राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास दिली भेट

0
547

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास दिली भेट

हिंगणघाट, अनंता वायसे : कोविड १९ प्रतिबंधक अभियाना अंतर्गत कोरोना प्रतिबंधक आढावा घेण्यासाठी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. कोविड रुग्णासाठी ऑक्सीजन व्यवस्था, वेंटीलेटर बेड तसेच रुग्णालय व्यवस्थेची माहिती यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार हे प्रामुख्याने हजर होते.
वर्धा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस व DHO डॉ. डवले साहेब यांचेकडून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील कोविड प्रतिबंधक व्यवस्थेची माहिती घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन तेथे सुद्धा कोरोना प्रतिबंधक मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या प्रोटोकॉल नुसार चाचण्या व औषध उपचार करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या सोई सुविधांची माहिती घेण्यात आली.
यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभरतार तसेच जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.तडस यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयास पुढे २ महिने पुरेल एवढा औषधी साठा आमदार निधितुन खरेदी करण्याकरिता विनंती केली. आमदार समीरभाऊ कुणावर यांनी जिल्ह्यामध्ये कोरोणा टेस्ट वाढला पाहिजे प्रोटोकॉल प्रमाणे टेस्ट होत नसून कोविड च्या चाचण्या प्रोटोकॉल प्रमाणे झाल्या पाहिजे ऑक्सिजनचा पुरवठा नियमित व्हावा औषधी बाबत तसेच बेड वाढवण्या बाबत चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here