माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य आरोग्य शिबीर व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार
३० तज्ञ डॉक्टरांकडून होणार रुग्णांची तपासणी व उपचार
राजुरा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानत प्रत्येक वर्षी माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा वाढदिवस सुदर्शन निमकर मित्र परीवाराकडून वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात आहे. सध्या राजुरा शहरात व ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात विविध आजारांनी नागरीक त्रस्त आहे. गोर गरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर मित्र परीवारांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसी ५ सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे भव्य आरोग्य शिबीर व मागील दहा वर्षात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या शिबीराचे उद्घाटक जागोबाजी साळवे माजी विभागीय व्यवस्थापक सिकाम लिमिटेड नागपूर हे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते जेष्ठ विधिज्ञ चंद्रपूर हे राहणार आहे. या शिबीरात कान, नाक, घसा, अस्थीरोग, स्त्रीयांचे आजार, हृदयरोग, लहान बालकांचे आजार, नेत्ररोग, मेंदू रोग, दंतरोग, चर्मरोग, त्वचारोग यासह अन्य रोगांची शिबीरात मोफत तपासणी होणार असून उपचार सुध्दा केले जाणार आहे. यासाठी विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहे. सोबतच सन २०१३ ते २०२३ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.
या शिबिरात डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. विनोद मुसळे, डॉ. प्रदीप मंडल, डॉ. नगिना नायडू, डॉ. प्रदीप वरघने, डॉ. व्यंकट पंगा, डॉ. सौरभ निलावार, डॉ. प्रशिक वाघमारे, डॉ. स्नेहल खोब्रागडे, डॉ. प्रिती कातकडे, डॉ. संदिप बांबोळे, डॉ. प्रविण येरमे, डॉ. भाग्यश्री गौरकार-मत्ते, डॉ. गिरीश बोबडे, डॉ. राजेश कतवारे, डॉ. शंकर बुऱ्हाण, डॉ विलास डाखोळे, डॉ. अशोक जाधव, डॉ. म. वा. शेंडे, डॉ. य. रा. मडावी, डॉ. प्र. र. टोंगे, डॉ. प्रांजली कोल्हे, डॉ. अंजली कातकर, डॉ. रविना गोरे, डॉ. शु. श्रीवास्तव, डॉ. व्ही. एन. राजु सुगरानी, डॉ. रा. य. यादव, डॉ. माया दुर्योधन, डॉ. अमित चिंदमवार, डॉ. इरशाद शेख, डॉ. सुरेंद्र डूकरे, डॉ. सम्रिन शेख यांचा सहभाग असून या आरोग्य शिबीराचा लाभ जास्तीत जास्त गरजूनी घेण्याचे आव्हान संयोजन समिती, माजी आमदार सुदर्शन निमकर मित्र परिवार यांनी केले आहे.