खनिज निरीक्षक बंडु वरखेडेची कारवाई

0
581

खनिज निरीक्षक बंडु वरखेडेची कारवाई ! अवैध रेतीचा टँक्टर जप्त !  

किरण घाटे

चंद्रपूर:- जिल्ह्यात अवैध रेती वाहनां वर कारवायां करण्यांचे प्रमाण माेठ्या प्रमाणात सुरु असुन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली चंद्रपूर तालुक्यात व जिल्ह्यात खनिकर्म विभागाने सर्वाधिक कारवाया करुन अवैध रेती तस्करांच्या अक्षरशा मुसक्या आवळल्या आहे.

दरम्यान याच विभागाचे खनिज निरीक्षक बंडु वरखेडे यांनी चंद्रपूर समिपच्या मार्डा येथे नागाळाच्या उमेश भानारकर यांचे नुकतेच अवैध रेतीचे वाहन (टँक्टर) रंगेहात पकडुन ते जप्त केले आहे. दंडात्मक कारवाई पाेटी वाहन मालकाने एक लाख दहा हजार नवशे रुपये खजिना दाखल केले असल्याचे समजते .विशेष म्हणजे वरखेडे यांनी रात्रीचे वेळेला गुप्त माहितीच्या आधारे हे रेतीचे वाहन पकडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here