रामकृष्ण मठ हे चंद्रपूरकरांसाठी प्रेरणादायी विचारांचं केंद्र व्हावं – आ. किशोर जोरगेवार

0
456

रामकृष्ण मठ हे चंद्रपूरकरांसाठी प्रेरणादायी विचारांचं केंद्र व्हावं – आ. किशोर जोरगेवार

वडगाव स्थित रामकृष्ण मठाच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

 

 

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. ते आजही आपल्या समाजाकरीता तितकेच महत्वाचे असून चंद्रपूर येथील वडगाव स्थित रामकृष्ण मठ हे चंद्रपूरकरांसाठी प्रेरणादायी विचारांचं केंद्र व्हावं असा आशावाद आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.

 

स्थानिक वडगाव स्थित रामकृष्ण मठाला त्यानी आज सकाळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मठाचे कार्यकारणी अध्यक्ष डाॅ. झाडे, सूर, सुरेश पनौली, गौरकार, प्रा. शाम हेडाऊ, देवानंद साखरकर, नरेंद्र लभाने यांच्यासह कार्यकारिणी चे सर्व सदस्यांच्याची उपस्थिती होती.

 

यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण पटाणपूरा गेट बाहेर स्थित माना टेकडी येथे जगन्नाथ बाबा मठाचे सौदर्यीकरण केले आहे. येथे झालेल्या नवनिर्माण कार्यातून या मठाला वेगळे रुप प्राप्त झाले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम करणा-या केंद्राचा विस्तार करुन ते विकसीत करण्याचा आमचा मानस आहे. धार्मीकतेकडून दुरावत चाललेल्या समाजाला धार्मीकतेचे महत्व पठवून देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जात आहे. याच अनुषंगाने आमच्या वतीने भजन महोत्सवाचे आयोजन केल्या जात आहे. याला भजन मंडळ आणि नागरिकांचाही उत्स्फृत प्रतिसाद मिळत असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले. यावेळी रामकृष्ण मठाच्या पदाधिकार्यांनी विविध सामाजीक व आध्यात्मिक उपक्रमांबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांना माहीती देत सभागृहासाठी निधी ची मागणी करणारे निवेदन दिले. आमदार जोरगेवार यांनीही या मठासाठी मदत करण्याचे यावेळी सांगीतले. हे स्थान एक सर्वांग सुंदर मठ म्हणून ओळख निर्माण करेल असा आशावादही आ. जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला. या बांधकामाच्या आराखड्याचीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here