!!आई बाबा !!

0
481

Il आई बाबा ll

 

नऊ महिने आपल्या पोटात ठेवते अनेक यातना सहन करते आपल्याला जन्म देते

ती आपली आई असते…

 

आपले चिमुकले हात धरून

जेआपल्याला चालायला शिकवते

ते आपले बाबा असते..

 

आई प्रेमाची नदी असते

तर बाबा प्रेमाचा सागर असते…

 

आपण पडलो तर आपल्याला लगेच उचलून कडेवर घेते ती आपली आई असते….

 

आयुष्याच्या वाटेवर चालतांना जे आपल्याला चुकतानां सावरतात ते आपले बाबा असते…

 

आपल्यावर चांगले संस्कार देऊन जी आपल्याला घडविते

ती आपली आई असते…

 

माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जे दिवस- रात्र काम करून घाम गlळते ते बाबा असते…

 

आपण काही चांगले केल्यावर जी आपल्याला जवळ घेऊन कुरवाळते ती आई असते…

 

आणि आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात ते बाबा असते…

 

शरीर आपलं असते हृदय आपलं असते पण त्या हृदयातील आत्मा म्हणजे आपले आई – वडील असते…

 

Il आई बाबांना समर्पित ll

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here