चंद्रपूर:- किरण घाटे
महाविद्यालयाचा वार्षिकांक म्हणजे महाविद्यालयाचे प्रतिबिंब! सत्र २०१९-२० करिता ‘ पर्यावरण, आरोग्य व स्वच्छतेकरिता युवाशक्ती ‘ विशेषांक गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे वार्षिकांक स्पर्धेकरिता पाठविण्यात आला होता. विद्यापीठाकडून वार्षिकांकाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
या वार्षिक अंकात ज्या विद्यार्थ्यांनी आपले लेख , कविता या माध्यमातून जे विचार अभिव्यक्त केले ते अभ्यासनीय आहेत. ‘ यशश्री ‘ च्या अनुषंगाने लिहिलेले साहित्य पुढील विद्यार्थ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. ‘ यशश्री ‘ वार्षिकांकाला दरवर्षी कोणता ना कोणता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते हे विशेष ! याचे सर्व श्रेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाते.
द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, संपादक प्रा. डॉ. संतोष देठे, सहसंपादक प्रा. संजय शेंडे, तसेच संपादक मंडळातील सर्व सदस्य, विद्यार्थी संपादक मंडळातील प्रमुख विशाल शेंडे व अन्य सदस्यगण, ज्यांनी या वार्षिकांकासाठी लेखन केले या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष कुंदोजवार , सचिव अविनाश जाधव, संस्थचे पदाधिकारी व सदस्यगण यांनीे अभिनंदन केले.
याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या!
