गडचिराेलीचे लोकमत जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांचा कोविड योध्दा म्हणुन गौरव ! 

0
472

गडचिराेलीचे लोकमत जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांचा कोविड योध्दा म्हणुन गौरव !

गडचिरोली -सुखसागर झाडे 

गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ .देवराव होळी यांच्या वतीने येथील दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांना विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कोविड 19 ही जागतिक महामारी राज्यासह ,संपूर्ण देशामध्ये पसरली आहे . मनोज ताजने व गडचिराेली जिल्ह्यातील लोकमतच्या प्रतिनिधींनी व वार्ताहारांनी आपल्या अमुल्य प्राणाची पर्वा न करता दै .लाेकमत वर्तमानपत्राच्या माध्यमांतून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कोविड संदर्भातील बातम्या साेबतच ज्वलंत समस्या अविरतपणे मांडल्या आहेत.त्यात त्यांनी दाखवलेली हिम्मत ,साहस,व सातत्य हे खरोखरचं वाखण्याजाेगे आहे .अर्थातच त्यांचे हे कार्य अत्यंत उल्लेखनिय व प्रेरणादायी अाहे .त्यांच्या याच कार्याची दखल घेत

केंद्र सरकारने 30 मे ला सात वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्याच्या निमित्याने सेवा हिच संघटना हा मुलमंत्र लक्षात घेऊन”सेवाकार्य दिन” चे आेचित्य साधुन गडचिरोली जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार म्हणून मनाेज ताजणे यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र आमदार डॉ. होळी यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले .

यावेळी दैनिक लोकमत व लाेकमत समाचार जिल्हा कार्यालयातील प्रतिनिधी हरीश सिडामसह सर्व टीम उपस्थित होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here