घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेशांची शृंखला सुरु

0
431

घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेशांची शृंखला सुरु

 

 

घुग्घुस शहरातील प्रभाग ११ च्या महिलांनी व पुरुषांनी मोठया संख्येत चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात व घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृहात प्रवेश घेतला.

याप्रसंगी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी नवप्रवेशीतांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शामराव काळबांडे, मंगेश वाघोसे, शंकर निहाल, संदीप आत्राम, संदीप वाघमारे, भीम दीप, राहुल नरवाडे, संतोष सेनानी, विशाल साळवे, गौतम माने, कुमार ठाकूर, शैलेश ठाकूर, सुरेश गायकवाड, प्रकाश मडावी, सुनील गायकवाड, संदीप वाघमारे, मंजू ठाकूर, तिरुपती राणा, मंगला गायकवाड, करुणा गायकवाड, वनिता सेनापती, पौर्णिमा पुसाटे,निशा शेख, मनिषा उईके, विद्या मडावी, मनीषा ताई, संजोकता दीप, सारिका आरले यांनी मोठया संख्येत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

बंडू गायकवाड यांना प्रभाग ११ ला मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात अली आहे. बंडू गायकवाड यांनी प्रवेशासाठी अथक परिश्रम घेतले.

यावेळी काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, दादू वर्मा
व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here