माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी आदीवासी जमीन व वनहक्क कायद्याच्या जाचक अटीची दखल

0
452

माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी आदीवासी जमीन व वनहक्क कायद्याच्या जाचक अटीची दखल

 

कोरपना, प्रवीण मेश्राम

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कृषी व संरक्षण मंत्री नुकत्याच चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेक शिष्टमंडळाने भेट घेऊन समस्या सोडवणूक करण्याची मागणी केली कोरपना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिदअली यांच्या सह आदिवासी व शेतकरी शिष्टमंडळाने खासदार शरद पवार साहेब यांची भेट घेऊन अनुसूचित जमाती अधिनियम 2006 व पारंपारिक वननिवासी वन हक्क जमीन देण्याचा कायदा केंद्र शासनाने मंजूर केला त्यात 13 डिसेंबर 2005 पूर्वी वन जमिनीवर वाहीती असेल अशा शेतकऱ्यांचे वनहक्क दावे शासनाकडे स्वीकारल्या जातात मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागातील राजुरा जिवती कोरपना हा भाग स्वातंत्रपूर्व काळात निजामकालीन असल्यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या अनेक गैर आदिवासी कुटुंबांना पुरावे उपलब्ध होत नाही तसेच निजामकालीन रेकॉर्ड प्राप्त होत नसल्याने तीन पिढ्यातील अट शिथिल करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न व कायद्यात दुरुस्ती करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली या भागातील बोमेवार प्रकरणांमध्ये विवाद ग्रस्त क्षेत्र घोषित झाल्यामुळे व न्यायालयाने या भागातील अनेक शेत जमिनी व वन क्षेत्र घोषित केल्याने विकास कामावर त्याचा परिणाम झालेला आहे तसेच पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्यामुळे वन हक्काच्या दावा दाखल करण्या पासून अनेक नागरिक वंचित आहे माणिकगड सिमेंट कंपनी च्या 1981 82 वित्तीय वर्षात शासनाने दिलेल्या भूपृष्ठ अधिकार जमीन हस्तांतरण प्रक्रिया मोघम व चुकीच्या पद्धतीने असल्याने शासनाचे वन पर्यावरण तसेच खाजगी शेतकऱ्यांची जमीन भूपृष्ठ अधिकार व भूसंपादन न करता आदिवासी कुटुंबांच्या जमिनी उत्खनन करून बेघर केल्यामुळे शासन-प्रशासन कंपनी विरुद्ध कारवाई न करता सतत आदिवासी वर गुन्हे दाखल करून वेठीस धरला जात आहे गेल्या दहा वर्षात वन महसूल व पोलीस प्रशासनाने एकाही प्रकरणाची चौकशी करून शासनापुढे वस्तुस्थिती सादर केली नाही भुमापन मोजणी ताबा प्रकीया संशयास्पद व चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय संपत्तीची कर चोरी अवैध उत्खनन आदिवाशाचे शोषण सुरू असल्याने दखल घेऊन आदिवासींना न्याय देण्याची मागणी केली याबाबत लगेच चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांना लक्ष घालण्याचे सुचना दिल्या लगेच संपर्क मंत्र्यांनी पुढील दौऱ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडे कुसुंबी नोकारी यासह आदिवासींच्या प्रश्नावर संबंधात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वस्त केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते शरद पवार यांनी याबाबतचा अहवाल एक महिन्यात मला पाठवा असे सुचविले तसेच चंद्रपूर जिल्ह्यात वाढते प्रदूषण शेतकऱ्यांचे घटते उत्पादन याकरिता शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्याचा आग्रह केला कोरपना तालुक्यामध्ये चार सिमेंट उद्योग आहेत मात्र स्थानिक बेरोजगाराच्या हाताला काम मिळत नाही कामगाराचा प्रश्न जैसे थे असल्याने परप्रांतीय लोकांना मोठ्या प्रमाणात काम मिळत असल्याने स्थानिक कामगारांना काम देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी नारायण डोहे धनराज जीवने तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोहेल अली आकाश खिरे संतोष ताजने मयूर एकरे भाऊराव कन्नाके केशव कुळमेथे विकास टेकाम गजानन खाडे मंगेश तिकट इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here