कोठोडा नदीघाटावर ट्रॅक्टर धारकांचा धुमाकूळ, रात्रपाळीत रेतीची चोरटी वाहतूक

0
761

कोठोडा नदीघाटावर ट्रॅक्टर धारकांचा धुमाकूळ, रात्रपाळीत रेतीची चोरटी वाहतूक

कोरपना,प्रतिनिधी : एकिकडे देश कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. कोव्हिड-१९ च्या प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून उपाययोजना सुरु असून यामुळे शासनाचा महसूल कसा वाढवता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कोडशी (खु.) नदी घाटातील रेतीचा लिलाव झाला आहे. मात्र कोठोडा येथील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे काही ट्राक्टर धारकांनी याकडे आपले लक्ष वळविले असून शेतकऱ्याच्या शेतातुन रस्ता काढून नदी घाटातील रेतीची बाहेर साठवणूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या ट्रॅक्टर धारकांकडून नदीत ट्रॅक्टर नेऊन नदी रेती भरत असल्याची बाब लक्षात आली आहे. सदर रेती तस्करी रात्रोच्या वेळी प्रशासनाची नजर चुकवून करत आहेत. या कोठोडा घाटावरुन दररोज चार ते पाच ट्रॅक्टर खुलेआम रेतीची चोरी करीत असुन यावर कोणाचाही वचक नाही. रेती तस्कर मुक्तपणे हा व्यवसाय करीत असून लाखो रुपयाच्या शासकीय महसुलावर पाणी फेरल्या जात आहे.
तालुक्यात रेती तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. या कोठोडा गावातील पोलीस पाटील व पटवारी यांना रेती पकडण्याकरीता शासनाने आदेश देऊन सुद्धा यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यांच्याच आशीर्वादाने रेती तस्करी चालू आहे की काय? असा भ्रम गावातील नागरिकांत निर्माण झाला आहे. या रेती तस्करीला महसूल विभाग आळा घालेलं की काय याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. युवा स्वाभिमान पार्टी कोरपना तालुका अध्यक्ष मोहब्बत खान यांनी येत्या दोन दिवसात रेती तस्करी न थांबल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here