मृतक मुलींच्या कुटुंबियांना सांत्वन भेट व आर्थिक मदत
जिल्हा युवक काँगेसचे कोरोना काळात मदत कार्य सुरूच
चामोर्शी, सुखसागर झाडे : दिनांक 18 मे रोजी वैनगंगा नदी पात्रात नाव (डोंगा) उलटून झालेल्या अपघातात तिन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या 3 मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना आज जिल्हा परिषद सद्स्या सौ. कविताताई प्रमोद भगत, युवक काँगेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, संजय गांधी निराधार अध्यक्ष प्रमोदभाऊ भगत, दलित आघाडीचे जिल्हादक्ष रजनीकांत मोटघरे, संजुभाऊ चन्ने, तौफिक शेख यांनी मृतक मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटून त्यांचे सांत्वन केले. सोबतच तिन्ही कुटूंबाना आर्थिक मदत केली.
यावेळी वाघोली येथील उपसरपंच राहुल पोरटे, माजी सरपंच तुळशीराम सातपुते, शामराव पोरटे, कालिदास पोरटे, जितेंद्र मानकर, वैभव घोंगडे, धनराज चापले व गावकरी उपस्थित होते. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्वाखाली कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांना 1 महिन्यापासून मोफत जेवन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चालू आहे.
आज प्रमोद भगत यांनी सदर माहिती ब्राह्मणवाडे यांना दिली असता तात्काळ भेट देऊन आर्थिक मदत केली. यावेळी जीप सदस्य यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर प्रमोद भगत यांनी बहुजन कल्याण मंत्री यांचेशी चर्चा करून आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले.