वाघाच्या हल्यात बैल ठार

0
790

वाघाच्या हल्यात बैल ठार

● शेतकरी आर्थिक अडचणीत
● त्वरीत मदतीची मागणी

 

कोठारी/ राज जुनघरे

मौजा पळसगाव येथील शेतकरी सोमा ढाडू मावलिकर यांची कवडजई शेतशिवारात सर्वे क्र. २६१/२ शेती असून त्यात ते भाजीपाल्याचे पिक घेतात. त्या शेतात दि. १४ मार्च रोजी रात्रोचे सुमारास वाघाने हल्ला चढवून बैलजोडीतील एका बैलास ठार करून २०० मिटर आओढत नेवून तनसाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवले. सकाडी शेतकऱ्याने बरीच शोधाशोथ केली असता सदरचा बैल मृतावस्थेत आढळला. त्यामुळे शेतकऱ्याचे किमान पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. सदर शेतकरी हा अल्प भुधारक भाजीपाला उत्पादक शेतकरी असून बैलजोडीतील एक बैल वाघाने ठार केल्याने पुढील शेती करणे अवघड झालेले आहे. तरी वन विभागाने या विषयाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांला तात्काळ मदत करावी अशी मागणी पळसगांव चे माजी सरपंच शंकर खोब्रागडे यांनी केली आहे. सदर शेतकऱ्याचे शेत हे जंगलापासून साधारण तिन कि. मी अंतरावर आहे.इतक्या आत येवून वाघाने बैलाची शीकार केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा माजी सरपंच शंकर खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे. सदरच्या प्रकरणात शेतकऱ्याला नुकसान भरपाई साठी शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करण्याची सुचना देण्यात आलेली आहे. परंतु पळसगावात ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्याला ऑनलाईन अर्जासाठी तालुका मुख्यालयी पायपीट करावी लागते आहे. त्याच बरोबर वनविभागाकडून नुकसान भरपाई साठी चराई परवाण्याची मागणी करण्यात येत आहे परंतु चराई परवाना काढणे आणि वितरित करणे हे वनविभागाचे काम आहे. याउलट चालू वर्षात चराई परवाने वनविभागाने काढलेही नाही आणि वितरीत केले सुध्दा नाही. दुसरी कडे चराई नुकसान भरपाई साठी चराई परवाण्याची मागणी करणे हे शेतकऱ्याना त्रास देण्यासाठी तुघलकी फरमान ठरत आहे. तरी वनविभागाने सदरची दुरुस्ती करुन शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी शंकर खोब्रागडे यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here