आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जल जीवन मिशन योजनेंच्या समस्यांबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे याच्या उपस्थितीत बैठक

0
378

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जल जीवन मिशन योजनेंच्या समस्यांबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे याच्या उपस्थितीत बैठक

चंद्रपूर मतदारसंघातील गावांची अंदाजपत्रके तातडीने सादर करण्याच्या सुचना

 

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे अतिशय संथ गतीने सुरु आहेत तसेच लोकप्रतिनीधींकडून यामध्ये काही समस्या सोडविण्याबाबत मागणी करण्यात आली होती. सदर प्रश्न मार्गी लावणे व कामे जलद पूर्ण करण्यासाठी पाणीपूरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत अधिकार्यांसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. त्या नंतर मागणीची दखल घेत राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुबई मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव अभिषेक कृष्णा, सी.आर. गजभिये, महेश पाटील, जिल्हा परिषदचे प्रभारी अधिक्षक अभियंता पी. डब्लू बुरडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. आर भालधरे, जिल्हा परिषदेचे उप अभियंता एच वाय. बोहरे यांच्यासह संबधित विभागाच्या अधिकार्यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या आराखड्यामध्ये समाविष्ठ असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावातील ज्या नळपाणी योजनेची अंदाजपत्रके तातडीने सादर करण्यात यावे तसेच तालुक्यातील तांत्रिकदृष्ट्या आराखड्यात समावेश नसलेल्या गावांचा येणार्या आर्थिक वर्षामध्ये समाविष्ट करुन तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना सदर बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबधित विभागाला दिल्या आहेत. तसेच आरखड्यातील मंजूर असलेल्या अंदाजिय रक्कमेपेक्षा जादाचा निधी लागत असल्यास ती उपलब्ध करुन देण्याचेही या बैठकीत मान्य करण्यात आले असून पुर्वीच्या असलेल्या नळपाणी योजनेच्या विहरी, टाक्या यांची नोंद नसल्यामुळे त्यांची जिल्हाधिकाय्रांमार्फत नोंद करुन बाबातही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
चंद्रपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिरण कडील गावाचे अंदाजपत्रक असलेल्या योजनेस तातडीने मंजूरी देणेबाबत सुचना या बैठकरण्यात आल्या तसेच तालुक्यातील मारडा, वेंडली, पिपरी, धानोरा, पांढरकवडा, वढा, उसेगाव, नकोडा, घूग्घूस म्हातारदेवी, बेलसनी, साखरवाही, शेणगाव, सोनेगाव, अंतुर्ला या गावातील प्रास्तवित नळपाणी योजनेबाबतही चर्चा करण्यात आली. त्यामूळे आता लवकरच चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावांना जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here