भारतीय डाक विभाग व गंगा सृष्टी तर्फे विविध पोस्टल योजनाचा मेळावा…

0
589

भारतीय डाक विभाग व गंगा सृष्टी तर्फे विविध पोस्टल योजनाचा मेळावा…

 

संगमनेर/अहमदनगर,प्रतिनधी 25/2/2022
भारतीय डाक विभाग श्रीरामपूर व गुंजाळ वाडी येथील गंगा सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने डाक विभागातील विविध योजनांचा मेळावा आज गंगा सृष्टी परिसरात भरवण्यात आला होता.
या मेळाव्यात गरजू व्यक्तींना इ श्रम कार्ड, आधार मोबाईल लिंक, बाल आधार, सुकन्या समृध्दी सह इतर जनकल्याण योजना लाभ देण्यात आल्या.
या मेळाव्यास मोठी गर्दी परिसरातील नागरिकांनी केली होती. परप्रांतीय कामगार यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या ठिकाणी सुमारे तीनशे बालकांचे आधार कार्ड नव्याने काढण्यात आले. तर शेकडो मजदुर, कामगार यांनी ई श्रम कार्ड चा लाभ घेतला. ई श्रम चा फायदा प्रामुख्याने असंघटित कामगार यांना विशेष ओळख म्हणून राहणार असून त्यांना दोन लाख रुपये पर्यंत विमा फायदा देण्यात येणार असून विविध सरकारी योजनांचा सरळ लाभ मिळणार आहे.
या मेळाव्यास पुणे क्षेत्रीय पोस्ट मास्तर जनरल श्रीमती जी मधुमिता दास यांनी भेट दिली.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे अधीक्षक हेमंत खडकिकर, संगमनेर सह्याक अधीक्षक संतोष जोशी, अमित देशपांडे, अमोल गवांदे यांच्या सह गंगा सृष्टी चे संचालक विशाल गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, राहुल गुंजाळ, सार्थक गुंजाळ यांनी मोठे परिश्रम घेतले. हा अत्यंत सामाजिक महत्त्वपूर्ण उपक्रम असून जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट मास्तर जनरल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here