मानवता आणि प्रेम हेच सर्वधर्माचे सार- राजूरा नगरीत प्रार्थना सभेचे आयोजन

0
639

मानवता आणि प्रेम हेच सर्वधर्माचे सार- राजूरा नगरीत प्रार्थना सभेचे आयोजन

राजूरा [चंद्रपूर] किरण घाटे🟪
‘मजहब नाही सिखाता आपस मे बैर रखना’
या गुलजारंच्या ओळीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणा-या राजुऱा नगरीत आला.

स्वरप्रिती कला अकादमी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास (नेफडो) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 मार्च2021 ला आयोजित विशेष सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. सम्पूर्ण मानवजातीला काेरोनाने पुन्हा एकदा आपल्या करह्यात घेतले आहे.
सर्व सोई, सुविधा, प्रशासनिक व्यवस्था असतानाही करोना आपले हातपाय पसरवतच आहे.
सदरहू प्रार्थना सभेची सुरुवात इतनी शक्ती देना दाता या सुमधुर गीताने स्वरप्रितिच्या संयोजिका आणि नेफडोच्या तालुका अध्यक्षा अलका सदावर्ते यांनी केली.तर या वेळी
गुरुवंदना-अनुष्का रैच, गणेश वंदना-मीरा कुलकर्णी, हनुमान चालीसा- स्वरूपा झंवर, बुद्धावंदना-करुणा जांभुळकर, नमाज-नशिरा शेख,शबाना शेख
पंजाबी गुरुबानी-हर्षिका हरभजन सिंग,इसाई प्रार्थना-अलका सदावर्ते यांनी सादर केली, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे , दे वरची असा दे या राष्ट्रसंताच्या भजनाने सारे वातावरण भावविभोर झाले,सुनेणा तांबेकर,वर्षा वैद्य,भावे,विना देशकर, राजश्री उपग्नलावार मेघा धोटे यांनी राष्ट्रवंदना सादर केली, तबला संगत नक्कावार तर हार्मोनियम वर मेश्राम यांनी साथ दिली. प्रार्थना सभेत नेफडोचे जिल्हा संघटक विजय जांभुलकर , नागोसे मैडम , खान मॅडम यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले, आयोजित कार्यक्रमाचे संचालन उत्तमरित्या नेफडोच्या तालुका सचिव मेघा धोटे, प्रास्ताविक दिलीप सदावर्ते,जिल्हा संघटक नफडो तर आभारप्रदर्शन, नेफडोचे तालुका विभागीय सचिव बादल बेल यांनी केले, दोन्ही संस्थेच्या वतीने रोपटे देऊन हिंदू, मुस्लिम ,शीख,इसाई यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, मनोज तेलीवार, संतोष देरकर,उमेश लढि, संदीप आडे, सुनैना तांबेकर यांनी मेहनत घेतली. सामजीक बांधिलकी जपणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे राजुऱ्यासह चंद्रपुर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असुन अनेकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here