‘स्थानिक उपाशी परप्रांतीय तुपाशी’ वेकोलि खदानीमध्ये खोट्या वाहन परवान्यांवर परप्रांतीयांनी हीसकला स्थानिकांचा रोजगार – युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर यांची कार्यवाहीची मागणी

0
577

‘स्थानिक उपाशी परप्रांतीय तुपाशी’ वेकोलि खदानीमध्ये खोट्या वाहन परवान्यांवर परप्रांतीयांनी हीसकला स्थानिकांचा रोजगार – युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर यांची कार्यवाहीची मागणी

निखिल पिदूरकर । वेकोलि चंद्रपूर अंतर्गत चालू असलेल्या सर्व उत्खनन खाणींमध्ये कोळसा उत्खनन तथा माती उत्खननाचे काम हे निवीदे द्वारे विविध मोठ्या बलाढ्य कंपन्यांना देण्यात येते व ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे .एक कंपनी जाते दुसरी कंपनी येते व या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा भरणा असतो. या कंपन्या ज्या ठिकाणी काम करतात त्याच ठिकाणी अस्थायी स्वरूपी राहण्याची व्यवस्था परप्रांतीय कामगारांना करून दिलेली असते. त्यामुळे तो कामगार आठ तासाच्या पगारावर चोवीस तास उपलब्ध असतो. हा एकमेव फायदा व उद्दिष्ट पाहून परप्रांतातील कंपन्या या ठिकाणी परप्रांतीय कामगारांना कामावर घेतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महालक्ष्मी कंपनी, ए। एस। डी। सी। गोलचा कंपनी, जी आर एन कंपनी, चड्डा ट्रान्सपोर्ट, मान कंपनी सिमेंट उद्योगांमध्ये वाहतुकीच्या काम करत असलेले अनेक मोठे ट्रान्सपोर्टर.. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा भरणा आहे यामध्ये नुकताच जी आर एन कंपनीमध्ये काही मध्य प्रदेश मधील काम करत असलेल्या कामगारांना मारहाण झाली होती जिवाच्या भीतीने ही दहाही कामगार त्या कंपनीतून काम सोडून पगार न घेताच आपल्या गावी वापस पळून गेली त्यात दहाही कामगारांचा पगार तर या कंपनीने पाचवीलाच याशिवाय कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून आंध्र प्रदेश व इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर कंपनीने माणसे आणलेली आहे त्यापैकी बऱ्याच माणसांकडे वाहन चालविण्याचे परवाने हे खोटे असल्याबाबतची माहिती उजागर झालेली आहे अशाच पद्धतीने इतर कंपन्यांमध्ये देखील खोट्या परवान्यांवर वाहने चालवायची पद्धत सुरू झालेली आहे या विरोधामध्ये आज युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूर तर्फेप्रादेशिक परिवहन विभागाला कारवाई करण्यास संबंधित निवेदन देण्यात आले तथा वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक यादव यांना देखील या संदर्भात आज निवेदन देण्यात आले या सर्व बाबींमुळे परप्रांतीय कामगार हा महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये कमावतो आहे .व कॅम्प मध्ये राहत असल्याने त्याला इतर खर्च देखील नाही. परंतु याच्या उलट स्थानिक कामगार 20 ते 25 हजार रुपयांमध्ये काम करायला तयार असून देखील स्थानिक तरुणाच्या हाताशी काम नाही स्थानिक आमदार खासदारांची उदासीनता याला खूप मोठे कारण असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी या पत्रामध्ये केलेला आहे. तरी तात्काळ कारवाईची मागणी देखील त्यांनी या निवेदनामध्ये केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here