भाऊरावजी रुडे कनिष्ठ महाविद्यालय उमरी प. येथे संविधान दिन साजरा.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
भाऊरावजी रुडे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय उमरी प. या विद्यालयात २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य शेरे सर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शेगर सर, नाईक सर, मलनस सर राठोड सर आणि सेवक अंकज रत्ने, पुरुषोत्तम राठोड व अतुल राठोड हे उपस्थित होते. आणि राठोड सर व शेरे सर यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले व निखिल शेरे राणी पवार या विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले. व प्राध्यापक बोडखे सर यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले व २६/११/२००८ च्या हल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.