कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणार कोविड केअर सेंटर सुरू

0
688

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणार कोविड केअर सेंटर सुरू

माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या पत्राची घेतली दखल

हिंगणघाट, अनंता वायसे (११ मे) : पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची दिनांक २९ एप्रिल २०२९ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्या संबंधाने कारवाई करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठवले आहे.
सध्या राज्यमध्ये कोविडमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र रुग्णसंख्या प्रचंड वाढल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात व कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विलगीकरण कक्ष ,ऑक्सीजन बेड सुविधा उपलब्ध करून देणे, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या मशीनचा पुरवठा करणे तसेच कोविडवर उपविचाराशी निगडीत इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात संबंधाने इतर बाबींवर भांडवली खर्च करण्यास मान्यता देणेबाबत प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यास अनुसरून शासनाने अटी नमूद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करावे असे परिपत्रक काढले आहे.
तरी भविष्याचा वेध लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करून जनतेचे हित जोपासावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

“कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्या संबंधाने माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी निवेदना द्वारे मागणी केली होते. त्या पत्राची दखल घेत पणन संचालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी पत्रक काढले असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्याप कोविड सेंटर सुरू करण्यात आले नाही. त्यासंबंधाने कारवाई करण्याबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here