शिवाजी महाराज रयतेचे राजे

0
575

शिवाजी महाराज रयतेचे राजे

राजुरा पत्रकार संघाचे अध्यक्ष एजाज अहमद ; रामपूर ग्रामविकास बहुउद्देशीय ससंस्थेद्वारा रक्तदान शीबीर

 

 

राजुरा : रामपूर बहुउद्देशीय संस्थेद्वारा हनुमान मंदिर देवस्थान येथे शिवजयंती निमित्य आयोजित रक्तदान शिबिर उदघाटन प्रसंगी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी यांनी सांगितले की, शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्या काळात खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज यांनी लोककल्याणकारी राज्य चालवीत लोकशाहीचे बीजमूळे रुजविले होती. सर्वसामान्यांचे राज्य म्हणून दरबारात सर्व जाती धर्मांच्या लोकांचा आदर करीत होते, जय भवानी जय शिवाजी हे फक्त घोषनेपूरते शब्द नसून अन्याया विरुद्ध लढण्याची शक्ती देणारे शब्द आहे. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे असल्याचे सांगितले.

रक्तदान शिबिराचे उदघाटक एजाज अहमद होते, अध्यक्ष सरपंच वंदना गौरकार, प्रमुख अतिथी पत्रकार सागर भटपल्लीवार, उपसरपंच सुनीता उरकुडे, सदस्या सिंधुताई लोहे, लताताई डकरे, विलास कोदिरपाल, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काकडे, बाबुराव जंपलवार, नामदेव गौरकार, रिता साळवे, डॉ. भाग्यश्री गौरकार, रमेश गौरकार, सुयोग्य साळवे, राहुल बानकर, केंद्रप्रमुख प्रभाकर जुनघरी, बापूजी बोबडे, भाऊराव बोबडे, पांडुरंग हनुमंते, रुपेश उरकुडे यांची उपस्थिती होती.

मागील तीन वर्षांपासून रामपूर ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा शिवजयंती निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून यावेळेस हनुमान मंदिर देवस्थान वॉर्ड क्रमान १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळेस ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराच्या अयोजनाकरिता वासुदेव लांडे, रितेश पायपरे, अच्युत बावणे, सुनील गौरकार, शुभम आस्वले, संदीप हिंगाने, सुरज भगत, शंकर उरकुडे, विनोद आस्वले, हर्षल गौरकार सह आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here