हेटीनांदगाव येथे शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न

0
634

हेटीनांदगाव येथे शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न

दिनांक १९/०२/२०२२ रोजी सायंकाळी ७ वा. धाबा पंचायत समिती क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजा हेटीनांदगाव येथे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला, सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ओबिसी आरक्षण संघर्ष समीतीचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, मा. इंजी भुषणभाऊ फुसे होते,फुसे यांचे आगमन होताच फटाक्याच्या आवाजात त्यांचे स्वागत करण्यात आले, महिलांनी सुद्धा मा. फुसे साहेब यांचे आरती द्धारे स्वागत करुन कार्यक्रम स्थळी नेण्यात आले. शिवाजी महाराज यांनी बहुजन समाजातील अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य कसे निर्माण केले होते,त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील बहुजन समाजातील सोशितपिडीत जनतेच्या हितासाठी संविधानात दिलेल्या कलमा, त्यातील पहिली म्हणजे ३४० हि ओबिसी च्या उन्नतीसाठी कशी होती व या कलमाला पूर्वी आणी आजही विरोध करणारे भारतीय स्वातंत्र्याच्या १९४५ पासुन आज चे सत्ताधारी लोक नेते हेच आहेत. यांचे कार्य कसे चालले आहेत. आणी या काॅग्रेस,राष्ट्रवादी, भाजप, सेना यांनी ओबिसींना विपीसिंग सरकारनी दिलेले २७% आरक्षणाती आज राजकीय आरक्षण कसे सपंविले याची विस्तृतपणे माहीती दिली, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, मा. तेजराज डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर, मा. प्रकाश तोहगावकर, तालुका अध्यक्ष गोंडपीपरी, मा.लक्ष्मणजी रामटेके तालुका उपाध्यक्ष,मा. भारतजी चंद्रागडे, तालुका उपाध्यक्ष, मा. पि, बी, भसारकर तालुका सदश्य, मा. अविनाश राऊत तालुका सदश्य, मा, अनिल दुर्गे तालुका सदश्य मा. अभिजित भगत सर्कल अध्यक्ष धाबा, मा, आशीष मुंजनकर सामाजिक कार्यकर्ते धाबा, मा चंदन झाडे युवा कार्यकर्ता धाबा, मा पत्रुजी येलमुले अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चेकनांदगाव,सोबत परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील तसेच परिसरातील युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. सुधाकर तांगडे, त्यांचे सहकारी यांनी केले. त्यास हेटीनांदगाव वासीय जनता यांनी मोलाचे योगदान दिले व कार्यक्रमाची सांगता उपस्थित जनसमुदायांना मसाला भाताचे वितरण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here