जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत सिद्धार्थ चव्हाण ठरला द्वितीय
🟢💠🟡राजूरा । किरण घाटे🟥🟣
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील बी. ए तृतीय वर्षामध्ये पदवीचे शिक्षण प्राप्त करीतअसलेला सिद्धार्थ राहुल चव्हाण या विद्यार्थ्याने दि. २९ डिसेंबर २०२० रोजी नॅशनल युथ पार्लमेंट तर्फे आयोजित झिरो बजेट नॅचरल फॉर्मिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे या विषयाची निवड करून ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर प्रथम क्रमांक अनिकेत दुर्गे या विद्यार्थ्याचा आलेला आहे.🟣🟥🟡 या ऑनलाईन स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. 💠☀️🟢यात निवड झालेल्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या दोन विजेता विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय युवा संसद साठी पात्र केले जाणार आहे. 🌀🟪🟩☀️या यशा बाबत सिद्धार्थ चव्हाण या विद्यार्थ्यांचे त्याचे शिक्षक, नातेवाईक , मित्रमंडळी, आई वडिलां कडून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे.
