गोंडपीपरी आष्टी मार्गावर भीषण अपघात हायवा आणि पीक अप ची समोरा-समोर धडक

0
1197

गोंडपीपरी आष्टी मार्गावर भीषण अपघात हायवा आणि पीक अप ची समोरा-समोर धडक

जिवीत हानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला

गोंडपीपरी(सूरज माडूरवार)

आष्टी गोंडपीपरी मार्गावर नवेगाव (वाघाडे) जवळ आज 11 वाजताच्या सुमारास पीक अप आणि हायवा त अपघात झाला ह्यात हायवा चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.


झाले असे की,
हायवा क्रमांक mh 34 B G 0998 राजुरा येथून विट्ठलवाडाकडे भरधाव वेगाने येत असताना नवेगाव जवळ पीक अप वाहन क्र. M H 40 CD 0029 ह्याच्यात जोरदार टक्कर झाली
टक्कर एवढी जोरदार झाली की दोन्ही वाहनांची दिशाच बदलली आणि हायवा चालकाने मार्गालगत असलेल्या एका शेतात हायवा घातल्याने उभे असणारे गहू पीकाचे नुकसान झाले आहे.
सामोरा समोर टक्कर झाल्याने यात दोन्ही वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. हायवा चालकांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने जखमीला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता नेण्यात आले असून
पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानेकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here