गोंडपिपरी -धाबा पोडसा मार्गाचे काम कासवगतीने सुरू त्या कंत्राटदारावर कारवाई करा

0
687

गोंडपिपरी -धाबा पोडसा मार्गाचे काम कासवगतीने सुरू

त्या कंत्राटदारावर कारवाई करा

प.पु शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेची मागणी

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

गोंडपीपरि धाबा ते पोडसा मार्गाचे काम सुरू आहे .सदर काम अतिशय संथगतीने सुरू असून मुख्य महामार्गाच्या बाजूला संपूर्ण खोदकाम केले आहे.तर दुसरीकडे डांबरीकरणावर खड्डे वाढल्याने अपघात होत असून काम संथगतीने असल्याने या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प.पु शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका अध्यक्ष गणपत चौधरी यांनी केले आहे.
सदर काम मंजूर होऊन २ वर्ष झाले कामात अनियमितता आढळून येत असून कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.रस्त्याच्या कडेला खोदून असून कसल्यास प्रकारे दिशादर्शक यंत्र नाही.समनधित विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.कामात गती यावी म्हणून लक्ष वेधण्यासाठी २६ मार्च ला रास्तारोको आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.यावेळी अध्यक्ष गणपत चौधरी,सचिव निलेश पुलगमकर,शंकर बोरकुटे,सुरेश भसारकर,सुभाष आदेवार,मुन्ना सिडाम, आनंद झाडे,संतोष वाट,यादव झाडे,बंडू सोनवणे, नाना येलमुले व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here