आमदार किशोर जोरगेवार यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट, उपलब्ध होणार 30 बेड

0
565

आमदार किशोर जोरगेवार यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट, उपलब्ध होणार 30 बेड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युध्द पातळीवर काम करुन शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील 30 बेड तात्काळ सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. त्यानंतर प्रशासनाने त्या दिशेने काम सुरु केले असून रात्री पर्यंत येथे कोरोना रुग्णांसाठी 30 बेड उपलब्ध होणार आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत येथील उपाय योजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्यात. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, महानगर पालिकेचे नोडल आॅफिसर धनंजय सरणाईक, समाजकल्यान विभागाचे नासरे यांची उपस्थिती होती.
संपूर्ण राज्यासह चंद्रपूरातही कोरोनाचा उद्रेक सुरु असून अपू-या व्यवस्थेमूळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यामूळे आहे त्या संसाधनांचा योग्य उपयोग करुन उत्तम रुग्णसेवा देण्याचे प्रयत्न करावे असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. दरम्याण आज त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली.रुग्णांच्या तुलनेत बेड कमी असल्याने परिस्थिती आणखी गंभिर होत चालली आहे.त्यामूळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेड तात्काळ वाढविण्याच्या सुचना त्यांनी केल्यात. येथे 100 बेडची व्यवस्था आहे. त्यापैकी 21 बेड हे सुरु करण्यात आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता उर्वरीत सर्व बेड तात्काळ सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. त्यानुसार येथील 30 बेड आज रात्री पर्यंत सुरु करण्यात येणार असून उर्वरीत इतर बेड सुरु करण्याच्या दिशेनेही युध्द पातळीवर काम केले जाणार आहे. परिस्थीती गंभिर आहे. मात्र उत्तम नियोजनातून यावर मात केली जावू शकते या ठीकाणी येणाऱ्या कोरोना रुग्णांवर उत्तम उपचार करण्यात यावा अश्या सूचनाही आ. किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here