महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवारा तर्फे रक्तदान करून वाहिली आदरांजली

0
605

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवारा तर्फे रक्तदान करून वाहिली आदरांजली

कोरोना महामारीत सतत दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

वर्षभरा पासून कोरोना महामारी कमी व्हायचे नावच घेत नाही एकीकडे सर्व सामन्याना जगावे कसे यातून मार्ग मिळत नसताना कोरोना महामारीने आणखी डोके वर काढले अशातच
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात फक्त 3 ते 4 दिवस पुरेल इतकास रक्त साठा उपलब्ध आहे.
ज्या प्रमानात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत त्यांना रक्ताची अत्यन्त गरज आहे याच हेतूने कोरोना काळात गडचांदूर येथील हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार तर्फे मागच्या वर्षी 3 एप्रिल ला रक्तदान शिबीर घेतले त्या शिबिरात रक्तदात्यांचा भरघोस प्रतिसाद पाहून या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जिल्हा आरोग्य विभागाने रक्तसाठ्यात तुटवडा आल्याचे सांगीतले याच हेतूने हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन करून माणुसकीच नातं म्हणून नेहमीच गडचांदूर शहरानी पुढाकार घेतला आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरवात करण्यात आली अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली एकून 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराला पोलीस स्टेशन गडचांदूर, मनोज भोजेकर, अरविंद गोरे, व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तसंचलीत करणारे डॉ पवार साहेब व त्यांची चमू यांचे सहकार्य लाभले, शिबिर घेण्यास नेहमी अग्रेसर असणारे सतिश बिडकर, महेश परचाके, सागर गुडेल्लीवार, महेश देरकर, पंकज माणूसमारे, नितीन भगत, योगेश सोंडवले, विक्की खाडे, पियुष माकोडे,नितेश डाखोरे. सचिन जगनाळे.स्वप्नील आत्राम, भाविक कुलमेथे, व अन्य सदस्यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडला या शिबिरास गडचांदूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी भेट देऊन आयोजकांचे मनभरून कौतुक केले जे रक्तदाते आहे त्यांनी रक्तदान करून महामानवास खरी आदरांजली वाहिली असे ते म्हणाले तर हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार चे गेल्या वर्षभरापासूनचे सामाजिक कार्य पाहून असेच कामे समोर सुद्धा सुरु ठेवण्यात यावे त्यास मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे सांगीतले.
समाजाने रक्तदान करून एक व्यक्ती एक जीव वाचविण्याचा संकल्प करावा असे संजसेवक मनोज भोजेकर यांनी म्हट.ले शिबिर यशस्वी पार पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here