नवरदेवाला वाटेतच मृत्यूने गाठले, सिंदेवाही नजिकची घटना!

0
605

नवरदेवाला वाटेतच मृत्यूने गाठले, सिंदेवाही नजिकची घटना!
नाजूकच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

सिंदेवाही (चंद्रपूर) किरण घाटे : लग्न साेहळा ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. लगेच वधूला स्वगावी घेऊन जाण्यासाठी नवरदेव वाहनात चढला. निघतांना ऐन वेळी नवरदेवाची तब्येत बिघडली. डाँक्टर मंडळींचा उपचार सुरु हाेण्या अगाेदरच ताे इश्वराला प्रिय झाला. ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत येणां-या आवळगाव येथे दि. १५ एप्रिलच्या दुपारी अंदाजे तीन वाजता घडली.
या घटनेबाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजुक पाेहनकर याचा विवाह ब्रम्हपुरी तालुक्यातील दीपाली नावाच्या तरुणीशी ठरला हाेता. रितीरिवाजा प्रमाणे ठराविक पाहुणे मंडळीत त्या दाेघांचा विवाह आनंदात पार पडला. वधुवरांकडील मंडळीनी दाेघांनाही (वधुवरांना ) शुभशिर्वाद दिले. पण वरात निघतांना वेळेवरच नवरदेव मुलाची तब्येत बिघडली. धावपळ करत त्याला ब्रम्हपुरी व नंतर गडचिराेली जिल्ह्यातील आरमाेरी येथील रुग्णालयात हलविण्यांचा प्रयत्न केला पण डाँक्टर मंडळीचा त्याचेवर उपचार न हाेता ताे रस्त्यातच इश्वराला प्रिय झाला. सदरहु घटनेमुळे दाेन्ही कुटुंबात दुखाची छाया पसरली असुन अनेकांनी या घटनेबाबत दुखवटा व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here