विहीरगांव वाचनालयाला स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ पुस्तकांची भेट

0
454

विहीरगांव वाचनालयाला स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ पुस्तकांची भेट

विहीरगांव:-वाचनालय सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय.यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी मुले वाचनालयात जातात. अशेच वाचनालय ग्रा.पं.विहीरगांव येथे आहे. गांवातील मुलांना शिक्षणांची गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात पुस्तकांच्या मध्यामातून परिवर्तन घडून यावं यासाठी श्रीहरी साळवे.यांनी आपल्या आई स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ आज दिनांक १९/०८/२०२० रोजी विहीरगांव येथील सार्वजनिक वाचनालयाला पुस्तकांची भेट दिली आहे. यावेळेस उपस्थितीमध्ये श्रीहरी साळवे सर, वामन साळवे सर गावंचे उपसरपंच ईशादजी शेख, आशिष मोहुलै, मयूर वांढरे, दिपक खेडेकर, क्रिष्णा प्रधान, संकेत वांढरे उपस्थित होते. या पुस्तकाच्या भेटीमुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here