ग्राम स्वच्छतेसह वैचारिक स्वच्छताही महत्वाची : डॉ. उमेश तुळसकर
रा. से. यो. च्या वतीने कर्मयोगी गाडगेबाबा जयंतीचे आयोजन

वर्धा/अनंता वायसे । मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक २३/०२/२०२१ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कर्मयोगी गाडगेबाबा जयंतीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे व उपप्राचार्य प्रा सपना जयस्वाल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रसंगी प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी गाडगे महाराजांनी समाज जागृती करतांना ग्रामस्वच्छतेसह कीर्तनाच्या माध्यमातून वैचारिक स्वच्छताही केली तीच वैचारिक स्वच्छता आजही होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले, नितेश रोडे यांनी गाडगे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर यांनी केले तर आभार प्रा मोनाली गिरडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.