धनगर अधिकारी कर्मचारी कार्यकारिणी गठित
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

आज दि.१९/०२/२०२१ रोज शुक्रवार ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधुन धनगर अधिकारी कर्मचारी संघटना ची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री. कॄष्णाजी बत्तुलवार सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. बंडुजी बुच्चे सर, श्री. प्रविण बुच्चे सर जिल्हाध्यक्ष ध.अ.क. संघटना तसेच सर्व धनगर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
या सभेमध्ये धनगर अधिकारी कर्मचारी संघटना कोरपणा तालुका ची कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष श्री. अजय आस्कर, उपाध्यक्ष श्री. गणपत गाडगे, सचिव श्री. रमेश दरेकर, सहसचिव श्री. किशोर निर, कार्याध्यक्ष श्री. संजय सातपुते, प्रसिद्धि प्रमुख श्री. संतोष बुच्चे, संघटक श्री. महेंद्र मंदे, मार्गदर्शक प्राचार्य श्री कृष्णाजी बत्तुलवार सर, श्री. रामुजी गावंडे सर, श्री. बंडुजी बुच्चे सर, श्री. गजानन दवंडे साहेब, श्री. सुरेश ढवळे सर, श्री. देवराव कालर साहेब, श्री. नथ्थुजी हुलके सर आदींची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात याप्रमाणे कोरपना तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.