कुख्यात आराेपीला पाेलिसांनी केले गजाआड, पाेलिसांची संयुक्तिक कारवाई

0
605

कुख्यात आराेपीला पाेलिसांनी केले गजाआड, पाेलिसांची संयुक्तिक कारवाई

चंद्रपूर, किरण घाटे : चंद्रपूर पाेलिसांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील २० वर्षिय कुख्यात आराेपी जिशान उर्फ जीशु सय्यद रिझवान रिझवी यांस नुकतेच गजाआड केले असुन त्याचेकडुन ४३६७७१ रुपयांचा माल हस्तगत केल्याचे पाेलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान सदर आराेपीचा एक साथीदार आराेपी शाहीद हा अद्याप फरार असुन चंद्रपूर पाेलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी त्याचा कसुन शाेध घेत आहे. दि. ५ मे ला पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुधाकर अंबोरे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. हर्शल अकेरे, पो.उ.नि. वाघमारे व डी.बि. पथकातील कर्मचारी कामठीचे उ.नि. वाघमारे व डी.बि. चे कर्मचारी यांनी आराेपीला माेठ्या शिताफीने शाेधून काढले. पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र. १२५/२०२१ कलम ३९२ भादवी अंतर्गत गुन्ह्यात त्यांस अटक केली. पोलीस स्टेशन रामनगर येथील अप क्र. ६७/२०२१, ३७७/२०२१ तसेच चंद्रपूर शहर अप क्र. ७३/२०२१, ४८/२०२१ असे एकुन ५ गुन्हे त्यांचे कडुन उघडकीस आणले. चाैकशी अंती त्यांचे कडून ५ नग सोन्याचे चेन ( किमत ४३६७७१/- चा माल) हस्तगत करण्यात आले. सदर आरोपीचा दुसरा साथीदार नामे शाहीद अली रज्जा अली रा. कामठी जि. नागपूर या दोघांनी मिळुन मोटार सायकलनी चंद्रपूर शहरात या शिवाय वर्धा, अमरावती, भंडारा, नागपूर येथे गुन्हे केले आहे.
आराेपी कडून माेठ्या प्रमाणात राज्यातील व इत्तर राज्यातील गुन्हे उघडकीस येणाची दाट शक्यता आहे. ही कारवाई सपोनि हर्षल अकेरे, पोउपनि वाघमारे , पो. हवालदार पुठवार, विलास निकुडे, नापोशी किशोर वैरागडे , नापोशी चिकाटे, पोशी प्रमोद, पोशी लालू तसेच पोलीस स्टेशन रामनगर येथील पाेलिस अधिकारी तसेच चंद्रपूर शहर येथील डी.बि. कर्मचारी यांनी केली. ८ पेक्षा अधिक गुन्हे रामनगर व चंद्रपूर शहर पो स्टेशनच्या डी.बि. पथकाने आता पावेताे आराेपीकडुन उघडकीस आणले आहे. चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नादेडकर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पो. ठाण्याचे पो.नी. रोशन आर. यादव, सपोनी मलीक पो.हवा. गजानन डोईफोडे, पो.हवा. प्रशांत शेंदरे, नापोशी. संजय चौधरी, नापोशी/09 पेतरस सिडाम, पो. शि/532 सतिष अवथरे, पो.शि/2430 लालु यादव, पो. शि/881 संदिप काबडी, म.पो.शि/2324 भावना रामटेके या पथकाकडून धाड टाकुन ही यशस्वी कामगिरी करण्यांत आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here