शिवाजी आश्रम शाळा सुब्बई येथे शिक्षक वानखेडे यांच्याकडून भारतीय राज्यघटना विद्यार्थ्यांना भेट

0
660

शिवाजी आश्रम शाळा सुब्बई येथे शिक्षक वानखेडे यांच्याकडून भारतीय राज्यघटना विद्यार्थ्यांना भेट

 

 

सुब्बई (राजुरा) : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन तसेच प्राचार्य डी. एस. झाडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी आश्रम शाळा सुब्बई येथे महेंद्रकुमार वानखेडे (माध्य. शिक्षक) यांचे कडून उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा चे सचिव अविनाश जाधव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डी. एस. झाडे उपस्थित होते.

यावेळी मा. वानखेडे सरांतर्फे एकूण 30 भारतीय संविधान प्रतिचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमांस जी. प. शाळा सुबई चे मु. अ. मा. धीरज मेश्राम, लखमापुरे सर,भाऊजी जाबोर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संविधान प्रत वाटप कार्यक्रमा नंतर माध्यमिक शिक्षक वानखेडे यांनी उपस्थित सर्व मंडळींच्या भोजना ची व्यवस्था केली. सर्व उपस्थितांनी वानखेडे सरांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here