राहुल गव्हाणे यांची भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड

0
863

राहुल गव्हाणे यांची भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड

 

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील पिंपळगाव रहिवासी राहुल रमेश गव्हाणे यांचे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची बहुजनांचे महानायक, क्रांतिकारक व नेते यांच्या विचारांची संघटना भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश संघटक डॉ. सुरेश शिंदे यांच्या शिफारशीनुसार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकार यांनी गव्हाणे यांची नियुक्ती पत्र देऊन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा, जनहित, राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढ, निकोप संवर्धन व संघटनेचे नाव उज्वल करण्यासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या नियुक्तीचे मित्र परिवारातून सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here