आवाळपूर गावात वाहतोय अवैद्य दारूचा महापूर!

0
547

आवाळपूर गावात वाहतोय अवैद्य दारूचा महापूर!

पोलिसांचे हाेतेय दुर्लक्ष पुतळा समिती नाहक त्रस्त

या अवैध दारू विक्री मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गोत्यात

 

 

कोरपना प्रतिनीधी
कोरपना तालुक्यातील आवाळपूर गावात अवैद्य देशी-दारू विक्री जोमाने सुरू आहे. पोलिस मात्र या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात विविध शंका निर्माण हाेत आहेत. व येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गोत्यात सापडली आहे.

 

विविध दारू पिऊन दारू पिण्याऱ्याचे आवारपूरात मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत त्यामुळे येथील पुतळा समिती आई रमाई मंडळाच्या अध्यक्ष त्रस्त झाले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली. तालुक्यासह गावखेडयात देशी दूकानांसह विदेशी दारूची दूकाने शासनाच्या परवानानगीने उघडण्यात आली यात काही शंका नाही.

 

मात्र तालुक्यातील काही अवैध दारु विक्रेते परवाना धारक देशी दारू दुकानातील दारू आता गावात आणून सर्रास विक्री करीत आहे. 35 रुपयाला मिळणारी नाईनंटी 50 रूपये तर 70 रुपयाला मिळणारा दारूचा एक पव्वा 100 ते 120 रुपयाला विकून (अवैद्य दारु) विक्रेते माला माल होत आहेत.

 

अवैद्य दारु विक्री करणारे गावात दोन ते तिन विक्रेते असून यात एक महिलेचा सुध्दा समावेश आहे. कधी रात्रीच्या वेळेस तर कधी भर दिवसा दुचाकीने दारु आणून गावात सर्रासपने चढत्या दराने हे दारु विक्रेते दारु विक्री करीत आहे . सदरहु बाबीकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालून गावातील दारू पूर्णता बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आवारपूर गावात देशी-दारूची अवैद्य विक्री सुरू असल्याने याचा विपरीत परिणाम गावावर होत आहे.

 

वृध्द व शाळकरी मुलासह तरूणवर्ग सुध्दा दारूच्या आहारी जातं असल्याचे दिसून येत आहे. गावात भांडण-तंटयाचे प्रमाण देखिल वाढले आहे.त्यामूळे गावातील दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी सातत्याने गावक-यांकडुन हाेत आहे .तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळपास एका पोलिसाची तयनात ठेवण्याची मागणी पुतळा समितीच्या माध्यमातून पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे यांनी एका निवेदनातू पोलीस आयुक्त यांच्या कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here