काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला कोरोणा योद्धयांचा सन्मान

0
482

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला कोरोणा योद्धयांचा सन्मान..

 

 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

 

 

 एरंडोल:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असातांना एरंडोल येथील भेटी दरम्यान त्यांनी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

एरंडोल ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कु.निकिता मानकर व कु.सिमा ननावरे यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ” कोरोना योद्धा ” म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार , प्रणिती शिंदे , आमदार शिरीष चौधरी , माजी खासदार डॉ . उल्हास पाटील , जिल्हाध्यक्ष अँड . संदीप पाटील डॉ फहराज बोहरी , एरंडोल तालुका अध्यक्ष विजय महाजन,शहराध्यक्ष संजय भदाने,युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख इम्रान सैयद,संजय कलाल,मदन भावसार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here