ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे आठवडा भरात झालेल्या दोन माता मृत्यूस जबाबदार कोण…?

0
464

ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे आठवडा भरात झालेल्या दोन माता मृत्यूस जबाबदार कोण…?

आलेल्या रुग्णांना रेफर करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्याचा सपाटा

ग्रामीण रुग्णालय येथे नियमित वैदयकीय अधीक्षक देण्याची मागणी

सुखसागर झाडे : चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालय येथे
भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका चामोर्शी आहे. लोकसंख्या चे दृष्टिकोनातून सुद्धा मोठा तालुका आहे. परंतु येथील आरोग्य व्यवस्था तालुक्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे कारण येथे उपचारा करिता येणारे गरोदर स्त्रिया व बाल माता यांना साधारण उपचारा करिता रेफर टू गडचिरोली करण्यात येत आहेत
अनेक गोरगरीब स्त्रिया व बाल माता जिल्हा सामान्य रुग्णालयात जात नाही मागील आठवड्यात येथील ग्रामीण रुग्णालयात दोन बाल माता मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले. ग्रामीण रुग्णालय येथे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत आहे येथे गरोदर स्त्रिया व बाल माता यांची तपासणी दुरूनच केली जाते सामान्य उपचारासाठी रूग्णांना रेफर टू गडचिरोली करण्यात येत आहे व अनेक समस्यांचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांचे मोबाईल सध्या स्विच ऑफ आहे. माहिती नुसार कळले ते सध्या आपले होम टाऊन सातारा येथे सुट्टीवर जाऊन आहेत.
परंतु येथील अव्यवस्था सुधार करण्यासाठी कुणीच वाली नाही असे निदर्शनास येत आहे सध्या या कोरोणा विषाणू जन्य परिस्थितीत वैदकिय सेवा सुदृढ असणे व जनतेच्या आरोग्याचा खेळ खंडोबा होऊ नये यासाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची सेवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक व आरोग्य सेवा देण्यासाठी फार मोलाची आहे.
ग्रामीण रुग्णालय येथे वैदकिय अधीक्षक यांची भूमिका फार महत्त्वाची आहे पण येथील वैदकिय अधिक्षीका फक्त पंधरा दिवस काम करून तीस दिवसांचा पगार काढत आहेत तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात ब्लड बँक येथून वेळेवर रुग्णांना रक्त लावण्यात येत नाही ,येथे विविध गावातील आशा वर्कर यांना सुद्धा प्रवेश बंद करण्यात आले आहे. येथील वैदकिय अधीक्षक कोणत्याही रुग्णांचे उपचार करीत नाही असे सुत्राद्वारे माहिती मिळाली येथील ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा चे वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व येथे तत्काळ नवीन वैदकिय अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने विराट आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here