विस दिवसापासून अधिकाऱ्या अभावी पशुवैद्यकीय दवाखाना बंद!

0
251

विस दिवसापासून अधिकाऱ्या अभावी पशुवैद्यकीय दवाखाना बंद!


विरूर स्टेशन/अविनाश रामटेके
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एकही अधिकारी व परिचर कार्यरत नसल्याने विरुर परिसरात पाळीव जनावरांच्या आरोग्याच्या प्रश्न एरणीवर आल्याचे दिसून येत असून या गंभीर अडचणी मुळे शेतकरी वर्ग आर्थिक विवेचनात सापळल्याची दिसून येत आहे.
सद्या हिवाळ्याची कडाक्याची सुरु असुन थंडीमुळे गाय, बैल, शेडी, मेंढी, म्हस, या पाळीव जनावरावर विविध आजार येतात,गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह दोन परिचर पदे मंजूर आहेत परंतु पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने दवाखानाच वीस दिवसापासून बंद आहेत. विरूर परिसरातिल डोंगरगाव, नवेगाव, चिंचाळा,खंबाळा केळझर, सुबई, मुंडीगेट,बापूनगर, भेंडाळा, धानोरा, सिंधी इत्यादी गावाला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 असुन विरुर येथील याच दवाखान्यातील अधिकाऱ्याकडे कार्यभार आहे. या परिसरातील मुख्य व्यवसाय शेती असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व दुग्ध उत्पादनाच्या व्यवसाय अनेक शेतकरी करतात मात्र त्यांच्या जनावरांना वेळीच आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनावरे आजारी पडल्यास यांना औषधासाठी तालुक्याच्या ठिकाणी 25 किलोमीटर अंतरावर जाऊन औषध आणावे लागते व त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या व शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य सरकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या भरण्यासाठी मनुष्यबळाची तरतूद करण्याऐवजी मलिंदा लाटण्यासाठी फक्त पशुवैद्यकीय इमारती बांधल्या जात आहे पशुवैद्यकीय इमारती बांधण्यापेक्षा ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यामधील रिक्त पदे तात्काळ भरून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी व पशुपालकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी विरुर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here