शिबिरात 52 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
272

शिबिरात 52 रक्तदात्यांनी केले रक्तदान

विरूर स्टेशन/अविनाश रामटेके
रक्तदान हे श्रेष्ठदान या म्हणीला अनुसरून देवराव भाऊ भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांच्या वाढदिवसानिमित्त विरूर येथे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाला यांच्या अथक परिश्रमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले, सामाजिक सलोखा जोपासून यावेळी एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर येथील वैद्यकीय अधिकारी प्रियंका पिंपळकर यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करून आभा कार्ड व सध्या सुरू असलेली कृष्टरोग, क्षयरोग मोहिमेबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यास नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिबिराला उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल,देवराव भाऊ भोंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, भीमराव पाला, सतीश कोमरवेल्लीवार, शंकर धनवलकर, प्रदीप पाला,सचिन बल्की, गुलाब चाहारे, शाहू नरनवरे, अविनाश रामटेके, रवींद्र चांदेकर, भास्कर सिडाम, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here