नेरी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमी युगल विवाहबद्ध

0
607

नेरी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमी युगल विवाहबद्ध

 

 

तालुका प्रतिनिधी/चिमूर

चीमुर तालुक्यातील नेरी येथील तंटामुक्त समितीच्या पुढाकारातुन एका प्रेमीयुगलांचा विवाह लावून देण्यात आला. सदर प्रेमीजोडप्यांचा विवाह ग्रापंचायतच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात पार पडला.

यामध्ये नवोदित प्रेमविराचे नाव राकेश रविंद्र लोखंडे जात बौद्ध रा. नेरी ता. चिमुर तर वधु प्रणाली दिलीप कडवे जात न्हावी शिक्षण बि.ए. रा. वडाळा पैकु ता. चीमुर या उभयतामध्ये गेली वर्षे भरापासुन प्रेम संबंध प्रस्थापित झाले. काँलर ट्रु द्वारे या दोघांमध्ये वार्तालाप होवून जवळीक निर्माण झाली आणी त्याचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला. परंतु घरच्या मंडळीचा विरोध असल्याने त्यांनी नेरी तंमुसकडे विवाह साठी अर्ज सादर केला. तमुस समितीने उभयतांचे कागद पत्राची तपासणी केली. विवाह ऐच्छीक वयोगट असल्याचे निष्पन्न झाल्याने व सर्वकष वधु, वरांंशी विचार पुस करून तंमुस समितीने या दोघांचा बौद्ध रितीरिवाजाने विवाह लावून देण्यासाठी पुढाकार घेवुन विवाह लावून देण्यात आला.

यावेळी तंमुस अध्यक्ष हरिदास चांदेकर, चंद्रभान कामडी उपसरपंच, रुस्तमखाँ पठाण, मानिक नगराळे, पिंटू खाटीक, गुलाब मानकर, मिलिंद जांभुळकर, पत्रकार प्रतिनिधी संजय नागदेवते, पो.पा शुद्धोधन घोनमोळे, राजु घोनमोडे, नागनाथ फुलझेले, ज्ञानेश्वर फुलझेले, सुरज शेंडे, सौ. गंगाबाई कामडी, सत्यभामा कामडी, ग्रा.प. कर्मचारी प्रविण रणदीवे, क्रुष्णा ढोले, उत्तम दडमल, विनोद पेटकर, प्रविण गायकवाड, प्रशांत गायकवाड, गणेश शेंडे वार्डातील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here