रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर!

0
569

रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर!

जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले  आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृष्य वाहनाकरिता पहिल्या 25 किलोमीटरसाठी  900 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा 407, स्वराज माझदा इ. साठी रु. 1200 व रु. 18 प्रती कि.मी., आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता रु. 2000 व रु.25 प्रती कि.मी. याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.

जे वाहन चालक व मालक विहीत भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी करतील, त्यांचेवर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्यात येईल.

नागरिकांनीही उपरोक्त ठरविलेल्या दरापेक्षा अधिक भाडे देऊ नये व याबाबत काही तक्रारी असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास लेखी स्वरूपात किंवा mh३४@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार सादर करण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here