शिवचरित्र परिचयाने पोदार स्कूल बल्लारपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0
584

शिवचरित्र परिचयाने पोदार स्कूल बल्लारपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

राजुरा:- अखंड स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे कुलदैवत राजा शिवछत्रपती यांच्या जन्मोत्सवानिमित्त पोदार इंटरनॅशनल स्कूल बल्लारपूर येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र पठाणाने शिवजयंतीचा कार्यक्रम दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शालेय परिसरात विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक डॉ. राकेश रंजन व मुख्याध्यापिका सौ. रुबीना शेख यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच शिवाजी महाराजांचे रूप साकारणारा पेहराव धारण केलेला इयत्ता 5 चा विद्यार्थी शौर्य सिंग याला तिलक लावून करण्यात आली. छत्रपती यांच्या जीवनावर आधारित माहितीचे पठण वर्ग 5 वीच्या विद्यार्थी हसनैन शेख यांनी केले तर 2 ऱ्या वर्गाची विद्यार्थिनी कु. मुग्धा वाटेकर हिने प्रार्थना म्हंटली, वर्ग 3 ची विद्यार्थिनी कु.आराध्या चांदोरे हिने सुविचार सांगितले त्यानंतर शब्दाचे महत्त्व वर्ग 5 ची विद्यार्थिनी कुमारी श्रीजा हिने पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक यांनी शिवचरित्रात नमूद दृढनिश्चय व आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार काढले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चैताली राव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा क्रीडाशिक्षक मयुर खेरकर यांनी आखली होती तर कार्यक्रम पूर्ण करण्यास वरिष्ठ लिपिक प्रेम मांझी व इतर कर्मचारी मनोज भोयर, प्रणील जिवतोडे व विवेक सत्रे यांनी सहकार्य केले त्यावेळेस शाळा प्रशासन व्यवस्थापक श्री शरद करोले, शाळेतील सर्व विद्यार्थी व इतर सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here